कागदी लगद्यापासून बनविण्यात येणाऱ्या अशास्त्रीय गणेशमूर्ती बनविण्यावर कारवाई करा

हिंदू जनजागृती समितीतर्फे मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना निवेदन

*⚡मालवण ता.०८-:* कागदी लगद्यापासून बनविण्यात येणाऱ्या अशास्त्रीय गणेश मूर्ती बनविण्यावर राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना निवेदन देण्यात आले. हिंदूंच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे अशास्त्रीय गणेश मूर्तीदान, कृत्रिम तलाव मूर्ती विसर्जन रोखण्यासाठी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना हिंदू जनजागृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे रत्नाकर कोळंबकर, अनिकेत फाटक, चेतन सकपाळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page