२३३ वाहन चालकांवर ४८,५०० रुपयाची दंडात्मक कारवाई
*⚡मालवण ता.०८-:* मालवण शहर आणि परिसरात धूम स्टाईल गाड्या चालविणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ऑगस्ट महिन्यात मालवणातील २३३ वाहन चालकांवर ४८,५०० रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी मालवणातील २३३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. मालवण शहरात ट्रिपल सीट वाहन चालविणे, लायसन्स नसणे, नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट तुटलेली असणे, नो पार्किंग एरियात दुचाकी व चारचाकी लावणे, हेल्मेट नसणे, आरसी बूक, पीयूसी नसणे आदी प्रकरणी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण भरड नाका व बाजारपेठ येथे वाहतूक पोलीस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर यांनी ही दंडात्मक कारवाई केली.
