ओरोस-:५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी ता. मालवणचे उपशिक्षक दिपक गोसावी यांना कोल्हापूर आविष्कार फाउंडेशनचा 2021चा राज्यस्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला. अविष्कार फाउंडेशन शैक्षणिक व सामाजिक कार्यात जे उल्लेखनीय काम करतात त्याची या पुरस्कारासाठी निवड करतात. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षक कार्यरत आहेत. याच पाश्वभूमीवर शिक्षकांचा सन्मान आवश्यक असून याबाबत त्यांनी केलेल्या उत्तम कार्याचा आढावा घेत त्याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिपक गोसावी हे जि. प शाळा. निरोम नं 2 ता मालवण येथून शिक्षक सेवेत रुजू झाले. त्याठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम व उल्लेखनीय काम करून शाळा नावारूपास आणली. जवळजवळ एक लाख रुपये शैक्षणिक उठाव केला. त्यानंतर त्यांची बदली शाळा वराड कुसरवे येथे झाल्यावर बीटातील पहिली डिजिटल शाळा करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना गुणवंत्ता विकासाचे धडे देत शाळेत एक लाख वीस हजार रुपये शैक्षणिक उठाव करून शाळेचा नावलौकिक केला. सध्या ते जि. प. प्राथमिक शाळा धामापूर बौध्दवाडी येथे कार्यरत असून शाळा सुधारण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. शाळेची छप्प्पर दुरुस्ती पासून शालेय रंगरगोटी करून शाळेचे रूप पालटण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे ज्ञान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या शाळेची तालुक्यात वेगळीच ओळख निर्माण केली. ग्रामस्थांच्या सतत संपर्कात राहून लोकवर्गणीतून एक लाख तीस हजार रुपयाचा शैक्षणिक उठाव केला. त्याच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक, समाजाच्या सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदचा वर्षाव होत आहे.
दीपक गोसावी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
