अन्यथा बांधकाम विभागाच्या मैलकुलीमार्फत कणकवलीतील कोसळलेल्या ब्रिजची चौकशी करा

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांचा टोला

*⚡कणकवली ता.०१-:* कणकवलीमध्ये १३ जुलै २०२० रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या पोच रस्त्याचे बांधकाम कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली त्यानंतर सुमारे वर्षभर अधिक कागदी घोडे नाचविण्याचा दशावतार राष्ट्रीय महामार्ग करत आहे. दररोज भोपाळ, मुंबई आयआयटी अशी वेगवेगळी नावे वापरून वेळ मारून नेत आहेत त्यापेक्षा त्यांनी बांधकाम विभागाच्या मैलकुलींकडून ते बांधकाम सुरक्षित आहे किंवा नाही ते तपासून घ्यावे.असा उपरोधिक टोला कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांनी लगावला आहे. अजूनही कणकवलीकरांच्या व वाहनधारकांच्या जीवावर संभाव्य दुर्घटनेची टांगती तलवार आहे.ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्याच दिवशी कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे यांनी धोकादायक काम पूर्णतः आता काढून नव्याने बांधकाम करण्याबाबत कंत्राटदाराला लेखी सूचना दिल्या. तसलेच आर्ट फॅक्ट इंडिपेंडंट इंजिनियर नागपूर यांनाही सुचित करण्यात आल्याचे प्रेस नोट घेऊन जाहीर केले. तसेच क्षतीग्रस्त धोकादायक भिंतीचे बांधकाम पूर्णतः काढून नव्याने बांधकाम करण्याचे आदेश मुख्य मुख्य अभियंता यांच्याकडूनही देण्यात आले. या दुर्घटनेसंदर्भात आम्ही उपविभागीय दंडाधिकारी यांचे कोर्टात दंड संहिता १३३ प्रमाणे अर्ज दाखल केला असता ऑक्टोबर २०२० मध्ये जे राष्ट्रीय महामार्गकडून धोकादायक भिंतीचे बांधकाम पूर्ण काढून नव्याने बांधकाम करण्याचे आदेश कायम करण्यात आले. ते पावसाळ्यानंतर ठेकेदार करतील असे कळविण्यात आले. वस्तुतः त्यानंतर दुसरा पावसाळा संपत आला तरी ठेकेदार कंपनी सरकारला चुना लावण्याचे काम करत आहे. धोकेदायक भिंती दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत जात आहेत. पोच रस्त्याच्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी १४ जुलै रोजी अधीक्षक उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग कोकण भवन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे येथील सचिन पोरे यांना या भिंतीच्या दुर्घटनेबद्दल स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता पण गेले वर्षभर त्याचा काहीही खुलासा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी केलेला नाही. तसेच दररोज भोपाळ, मुंबई आयआयटी अशी वेगवेगळी नावे वापरून वेळ मारून नेत आहेत त्यापेक्षा त्यांनी बांधकाम विभागाच्या मैलकुलींकडून ते बांधकाम सुरक्षित आहे किंवा नाही ते तपासून घ्यावे. गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे या महामार्गावर रहदारीचे प्रमाण कमी होते आता लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे व गौरी-गणपतीच्या सणा करीता येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. वस्तुतः या ठेकेदार कंपनीमुळे सर्व राजकीय यंत्रणा व प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तसेच या ठेकेदार कंपनीच्या कामांचे फोटो सोशल मीडियावर जगामध्ये व्हायरल होत असून त्यामुळे आपल्या देशाची ही बदनामी होत आहे गेले वर्षभर आम्ही माननीय उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे ठेकेदार कंपनी पालन करेल या आशेवर होतो पण ते न्यायालयाचा अपमान करत आहेत. या कामावर इंडिपेंडंट इंजिनियर आर्ट फॅक्ट नागपूर यांनी पूर्णतः देखरेख करण्याची आहे. तसेच सेफ्टी कन्सल्टंट म्हणून इंडियन इन्फ्राटेक ही कंपनी आहे. हे दोघेही बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे त्यांच्या विरोधातही न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page