प स सदस्या सोनाली कोदे यांच्या स्वनिधीतून एचपी पंप

रेवंडी सरपंच प्रिया कांबळी यांच्याकडे केला सुपूर्द

मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सोनाली कोदे- तळाशीलकर यांच्या माध्यमातुन कोरे महान येथील रेवंडी व मिर्याबांदा सर्जेकोट संयुक्त नळयोजनेसाठी पंचायत समिती स्तर पंधरा वित्त आयोग अंतर्गत मंजूर झालेला १२ एचपी पंप सदस्या सोनाली कोदे यांच्या हस्ते रेवंडी ग्रामपंचायत सरपंच प्रिया कांबळी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी ग्रामसेविका चेंदवणकर, पाणी कर्मचारी लक्ष्मण कांबळी, ग्रामपंचायत कर्मचारी शर्विन कांबळी, समिर कांबळी व अरुण कांबळी, नरेश करलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page