कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणता मग २७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी का करता?

तिसऱ्या लाटेत जिल्हा आरोग्य विभाग काय करणार? ;परशुराम उपरकर यांचा सवाल

*⚡कणकवली ता.०१-:* एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून शासनाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे. निधी आयोगाने दररोज देशात पाच लाख कोरोना रुग्ण मिळतील असा अंदाज वर्तविला आहे असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये खासगी पद्धतीने सेवा देणाऱ्या २७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा थांबवण्यात आली आहे.आता तिसरी लाट येणार असल्याची एकीकडे सरकार सांगत आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणार आहेत.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्यास कोविड सेंटर बंद केल्यास उद्या रुग्णांना सेवा कशी मिळणार?आता सेवेतून डॉक्टर, आरोग्यसेविका,वार्ड बॉय यांना कमी करणाऱ्या ठाकरे सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? तिसऱ्या लाटेत जिल्हा आरोग्य विभाग काय करणार?पालकमंत्री, खासदार, आमदार गप्प राहून जनतेच्या आरोग्याशी खेळणार का?असा सवाल मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी त्यांच्यसमवेत मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले,सरकारने त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान डिसेंबर २०२१ पर्यत मुदत वाढ दिली पाहिजे होती. सरकारला तिसरी लाट येणार असे वाटत असेल तर त्यांचे नियोजन आताच केले पाहिजे. आता अतिरिक्त कर्मचारी कमी केल्यास,ते कर्मचारी व डॉक्टर पाहता परत हे या सेवेत येतील का नाही?अनुभवी हे लोक मिळतील का नाही?याची चिंता आहे.कोविड काळात सेंटरमध्ये जाऊन फोटो काढणारे नेते बरेच होते.बरीचशी कोविड सेंटर उभी केली,आता ते साहित्य काय करणार?त्यासाठी पुन्हा साहित्य घेणार का?आता चाकरमानी येथील तेव्हा पर्मनंट आरोग्य कर्मचारी सर्व सीमा व रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये किती कर्मचारी राहणार? याचा शासनाने विचार केला पाहिजे.त्यावेळी खासगी कर्मचारी उपयोगी पडतील.चाकरमानी मोठ्या संख्येने येणार आहे.त्या चाकरमान्यांना आर्टिपीसीआर तपासण्या करण्याचा भुर्दंड घातला आहे.या ठिकाणी चाकरमानी आल्यानंतर कोविड वाढेल असे आरोग्य अधिकारी सांगत आहेत.दुसऱ्या लाटेत १४०० लोकांचे जीव गेले तसेच आता लोकांचे जीव घ्यायचे आहेत का? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला आहे. याबाबत त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे,यासाठी मी मनसेच्या वतीने आरोग्य मंत्री व आरोग्य सचालकांना पत्र देणार आहे.कोकणी जनतेला शासन व लोकप्रतिनिधी फसवतात.कोकणी जनतेचे जीव गेले तरी फरक पडत नाही.इथला मंत्र्यांनी काढलेल्या कर्मचाऱ्यांना मुदत वाढ द्यावी,पुन्हा कोविड सेंटर चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केला.

You cannot copy content of this page