भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश
*⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ शहर पान बाझार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोहेब खान यांनी आज जाहीर रित्या भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे, युवा नेते आनंद शिरवलकर, ओबोसी जिल्हाध्यक्ष दिपक नारकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, माजी सरपंच प्रशांत राणे, राकेश नेमळेकर, राजवीर पाटील आदी उपस्थित होते
