कुडाळ पोलीस ठाण्याचे फुलचंद मेंगडे नवे इनचार्ज

शंकर कोरे यांची सावंतवाडीत बदली;भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणेंनी दिल्या शुभेच्छा

*⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची बदली सावंतवाडी पोलीस ठाण्यात झाल्याने त्यांच्या जागी देवगड येथे प्रभारी निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले फुलचंद मेंगडे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी यापूर्वी रायगड येथे ३ वर्षे पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर उस्मानाबाद साडे चार वर्षे, जालना ३ वर्षे येथे काम केले. मार्च २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्यांनी देवगड व सावंतवाडीत प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मेंगडे यांनी तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page