*⚡वेंगुर्ला ता.३१-:* जन्माष्टमीदिवशी काहींच्या घरोघरी पूजन केलेल्या श्रीकृष्णाचे आज ओहोळात, विहिरीत तसेच मांडवी खाडी येथे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार काहींनी आपल्या घरी श्रीकृष्णाचे पूजन केले. काहीठिकाणी बाळकृष्ण, गाईसमवेत श्रीकृष्ण तर राधाकृष्ण असे श्रीकृष्णाचे रुप पहायला मिळाले. सोमवारी सायंकाळपासूनच श्रीकृष्णाच्या पूजनाला सुरुवात झाली होती. रात्रौ १२ पर्यंत ठिकठिकाणी पूजन सोहळा सुरु होता. आज सायंकाळी या श्रीकृष्णांचे प्रत्येकाच्या पद्धतीनुसार विसर्जन करण्यात आले.
घरोघरी पूजन केलेल्या श्रीकृष्णांचे विसर्जन
