*⚡मालवण ता.३१-:* मालवण मधील एकता मित्रमंडळातर्फे वार्षिक दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आली. कोरोना विषयक शासनाच्या नियमांचे व निर्बंधांचे पालन करत मित्रमंडळाने एकदम साध्या पद्धतीने जमिनीलगत हंडी बांधून ती लहान मुलाच्या हस्ते फोडण्यात आली. मालवण मधील हे मंडळ नेहमीच आपल्या आदर्शवत कार्यपद्धतीने आणि कोरोनाच्या काळात सुद्धा समाजहिताचे कार्यक्रम घेऊन आणि ते कोरोनाचे शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन करून पार पाडले आहेत. या मित्रमंडळातर्फे शहरातील बाजारपेठ मधील वार्षिक व प्रसिद्ध दहीहंडी विविध कार्यक्रम आणि विविध खेळ स्पर्धा घेऊन फोडली जाते. पण यावर्षीच्या कोरोनाच्या महामारीमुळे दहीहंडी बांधण्यास बंदी असल्याने एकता मित्रमंडळाने एकदम साध्या पद्धतीने जमिनीलगत बांधून लहान मुलाच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी सर्व एकता मित्रमंडळाचे सदस्य सोशल डिस्टनिंग तसेच मास्क बांधून उपस्थित होते.
लहान मुलांच्या हस्ते हंडी फोडून एकता मित्रमंडळातर्फे साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा
