उद्योजक सागर वाडकर यांचा पुढाकार
मालवण (प्रतिनिधी) लहान मुलांना शिक्षणाची अधिक आवड निर्माण व्हावी यासाठी गोपाळकाला उत्सवाचे औचित्य साधून मातृत्व आधार फाउंडेशन मालवण या सामाजिक संस्थेने अंगणवाडीच्या मुलांना उद्योजक श्री. सागर वाडकर पुरस्कृत शैक्षणिक साहित्य वाटप केले. तारकर्लीसह मालवण शहरातील धुरीवाडा, रेवतळे येथील अंगणवाडी मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत तारकर्ली मस्य शाळा (प्राथमिक ) येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्योजक सागर वाडकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे,संतोष नागवेकर, दादा वेंगुर्लेकर, तारकर्ली सरपंच सौ. स्नेहा केरकर, डॉ. जितेंद्र केरकर, अंगणवाडी सेविका, माधुरी तारी, संध्या वायंगणकर, लतिका मयेकर, सुप्रिया केरकर, तसेच लहान मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. तारकर्ली परिसरातील चार अंगणवाडी व त्यानंतर धुरीवाडा साईमंदिर अंगणवाडी, रेवतळे फाटक शाळा अंगणवाडी येथेही हा कार्यक्रम करण्यात आला. या साहित्य वाटपाबाबत अंगणवाडी सेविका आरोंदेकर, गांगनाईक मॅडम यांनी सागर वाडकर आणि मातृत्व आधार फाउंडेशनचे आभार मानले.
