निर्बंध आणणाऱ्या सरकारचा निषेध करत मनसेतर्फे केशवसुत कट्टावर दहीहंडी

मनसेकडून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी

*⚡सावंतवाडी ता.३१-:* दहीहंडी उत्सवावर निर्बंध आणणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करत मनसेच्या वतीने आज येथील केशवसुत कट्टावर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मनसेकडून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, अनिल केसरकर, सुधीर राऊळ, राकेश परब, विनय सोनी, विठ्ठल गावडे आदी उपस्थित होते. शासनाकडून दहीहंडी उत्सवावर अनेक निर्बंध घालण्यात आले यामुळे बालगोपाळांमध्ये निरूत्साहीचे वातावरण आहे मात्र काही झाले तरी दहीहंडी फुटणारच, असा इशारा पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिला होता यामुळे मनसेकडून सर्वत्र हंडी फोडून शासनाचा निषेद करण्यात आला. सावंतवाडी शहरात देखील मनसे काढून येथील केशवसुत कट्टा येथे हंडी उभारण्यात आली होती सायंकाळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत मनसे पदाधिकारी यांनी हंडी फोडली यावेळी उपस्थितांमध्ये हंडी फोडण्याचा एक वेगळाच उत्साह पाहावयास मिळाला तर यावेळी अरे या आघाडी सरकारच करायचं काय : खाली डोके वर पाय अशा प्रकारे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली

You cannot copy content of this page