ठाणे उपायुक्तांवरील भ्याड हल्ल्याचा वेंगुर्ला न. प. कर्मचाऱ्यांकडून निषेध

काम बंद आंदोलन : नगराध्यक्षां सह पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन

*⚡वेंगुर्ला ता.३१-:* ठाणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर परप्रांतीयाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर्मचारी संघटनने एक दिवस काम बंद आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या बाहेर आंदोलन छेडून निषेध व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याचे निवेदन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासह पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना सादर केले. ठाणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त कल्पिता पिंपळे ह्या मार्केट मधील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता तेथील एका परप्रांतीय व्यवसायिकाने त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताची तीन बोटे छाटली गेली. या घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रभर कर्मचारी एम्प्लाइज युनियन एकत्र आली आहे. वेंगुर्ला न. प. कर्मचाऱ्यांकडूनही या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डाॅ. अमितकुमार सोंडगे, कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल तसेच निशा आळवे, अभिषेक नेमाणे, अभिजीत गिरप, विठ्ठल सोकटे, शैलेश सातार्डेकर व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page