शिवगंगा नदीत वाहून गेलेला भुषण नाईकचा मृतदेह सापडला

मालवण येथील रेस्क्यू टिमला मृतदेह शोधण्यात यश

*⚡वैभववाडी ता.३१-:* शिवगंगा नदीत वाहून गेलेला भुषण लाँमवेल नाईक (वय 40 रा. रावेत पिंपरी चिंचवड पुणे) या युवकाचा मृतदेह अखेर सापडला आहे. तिसऱ्या दिवशी मालवण येथील रेस्क्यू टिमला मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. शिवगंगा नदीपात्रात लोरे ते गडमठ दरम्यान आज दुपारी भुषणचा मृतदेह आढळून आला आहे.  तहसीलदार रामदास झळके यांनी ही माहिती दिली आहे.    तहसीलदार यांच्या उपस्थितीत या टिमने सोमवार पासून शोधमोहीमेला सुरुवात केली होती. मंगळवारी नदीपात्रात त्यांना मृतदेह आढळून आला आहे.    लोरे नं. 2 बौध्दवाडी येथील श्री.नितीन नारायण पेडणेकर वय 40 रा. यांच्यासमवेत भूषण हा पुण्यावरून गावी आला होता. लोरे येथील शिवगंगा नदीत नितीन व भूषण व इतर दोघेजण नदीपात्रात आंघोळीला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने भूषण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. भूषण वाहून गेल्याची माहिती नितीन याने स्थानिक ग्रामस्थांना दिली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. रविवारी भूषण याला शोधण्यासाठी ग्रामस्थ, आपत्ती प्रशासन व पोलिस यांनी मेहनत घेतली. करूळ येथील सह्याद्री जीवरक्षक टीमने देखील शोधमोहिमेत सहभाग घेतला. 

संपूर्ण नदीपात्रात या टीमने शोधमोहीम राबविली. पण शोधण्यात त्यांना यश आले नाही. सोमवारी मालवण येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. या टीमने मंगळवारी पुन्हा शोधमोहीम हाती घेतली. लोरे ते गडमठ दरम्यान त्यांना भुषणचा मृतदेह आढळून आला आहे.

You cannot copy content of this page