वैभववाडी ते भुईबावडा मार्गावर पडलेले खड्डे चार दिवसात बुजवा

अन्यथा कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलन करणार:शरद कांबळे

*⚡वैभववाडी ता.३१-:* वैभववाडी ते भुईबावडा मार्गावर पडलेले खड्डे चार दिवसात बुजविण्यात यावे.अन्यथा कोणतीही पूर्व कल्पना न देता आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शरद कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे नागरीकांना प्रवास करतांना जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहे. कोकणातील प्रमुख सण गणेशउत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे.या दरम्यान वाढणारी रहदारी लक्षात घेऊन येत्या चार दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात यावेत.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.नायब तहसिलदार अशोक नाईक यांच्याकडे निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते शरद कांबळे , राजेंद्र कांबळे, व इतर.

You cannot copy content of this page