*⚡कणकवली ता.३१-:* मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीनजीक कणकवली ओसरगाव डगळवाडी येथील असरोंडी फाटा नजीक दुपारी 3:30 च्या दरम्यान दोन कारचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारने एकमेकांना धडक दिल्याने एक कार रस्ता सोडून खाली उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे या अपघातात दोघांना दुखापत झाली असून दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नसले तरी असरोंडी फाट्यावरून महामार्गावर कार येत असताना कुडाळ वरून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारला धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यावेळी तातडीने महामार्ग पोलीस दाखल होत आहे. वाहतूक सुरळीत केली असून दुखापत झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
ओसरगाव -डगळवाडी येथे कारचा अपघात;
