मालवण दि प्रतिनिधी मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती सीताबाई श्रीपाद घुर्ये प्री. प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या बाल चमुंच्या वतीने गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी या बालगोपालांनी श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय व्यवस्थापनाने काही मोजक्याच विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमी निमित्त निमंत्रित केले होते. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्रभारी मुख्याध्यापक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वृंद उपस्थित होते.
श्रीम.सीताबाई श्रीपाद घुर्ये प्री. प्रायमरी स्कूलच्या बालचमु कडून गोकुळाष्टमी साजरी
