जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायतीचे घवघवीत यश;३ सप्टेंबर रोजी कोकण आयुक्तांच्या हस्ते बक्षीस वितरण
सिंधुदुर्गनगरी ता ३० महा आवाज अभियान ग्रामीण अंतर्गत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ,प स कुडाळ,प स वैभववाडी,ग्रा प अणाव,ग्रा प मांगवली,यांनी पुरस्कार मिळविले आहेत. या पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना ३ सप्टेंबर रोजी कोकण भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात विभागीय कोकण आयुक्त यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी २० नोव्हेंबर ते ५ जून २०२१ या कालावधीत राज्यात महा आवास अभियान (ग्रामीण) राबविण्यात आले. या अभियानात विविध उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था ,व्यक्तींना महा आवाज अभियान ग्रामीण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पंचायतराज संस्थांची निवड करण्यात आली असून प्रधानमंत्री आवास योजने मध्ये कुडाळ पंचायत समितीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर राज्य पुरस्कृत आवाज योजना मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने द्वितीय क्रमांक पटकविला आहे .सर्वोत्कृष्ट पंचायत समितीमध्ये तृतीय क्रमांक पंचायत समिती वैभववाडी, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतमध्ये प्रथम क्रमांक ग्रामपंचायत अणाव (तालुका कुडाळ) ,तृतीय क्रमांक ग्रामपंचायत मांगवली (तालुका वैभववाडी) यासह राज्यभरातील पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती चा विभागीय कोकण आयुक्तांच्या हस्ते ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कोकण भवन येथील कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज दिली.
