सिंधुदुर्ग -रत्नागिरीत युवकांना उद्योजक होण्यासाठी सुबुद्धी दे

माजी आम.प्रमोद जठार यांनी म्हाडकादेवी मातेला घातले गाऱ्हाणे

*⚡कणकवली ता.३०-:* भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस माजी आम.प्रमोद जठार यांनी कासार्डे येथील जागृत देवस्थान म्हाडकादेवी मातेचे दर्शन घेतले आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात युवकांना उद्योग रोजगार मिळावा याकरिता देवीकडे प्रार्थना केली. उद्योग खात्याच्या माध्यमातून कोकणात युवकांना रोजगार मिळावा याकरिता येथील युवकांना देवी मातेने उद्योजक होण्यासाठी सुबुद्धी देण्याचे गाऱ्हाणे घातले. यावेळी त्यांच्या सोबत प्रसाद जाधव, रवींद्र शेट्ये, बबलू सावंत ,भाजप राष्ट्रीय सचिव श्री देवधर यांचे स्वीय सहायक श्री झा ,रोहित महाडिक, इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page