जनआशीर्वाद यात्रा यादगार आणि ऐतिहासिक ठरली

राजन तेली;दीपक केसरकरांनी संघर्षाची भाषा करू नये;जनआशीर्वाद यात्रा अडविणारे लपले कुठे?

*⚡कणकवली ता.३०-:* केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा प्रचंड यशस्वी ठरली. मागील ना.नारायण राणे यांनी 3 दिवस सिंधुदुर्गात 40 ठिकाणी मनोगत व्यक्त करतानाच जवळपास 150 ते 175 ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.केंद्रातील 43 मंत्र्यांमध्ये ऐतिहासिक असा हा दौरा ठरला. संपूर्ण कोकण पट्ट्यात भाजपाकडे जनता आकर्षित झाली आहे अशी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केली. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही यात्रा यादगार आणि ऐतिहासिक ठरली असून भाजपा बरोबरच जनतेतही उत्साह निर्माण करणारी ठरली असल्याचे राजन तेली म्हणाले. भाजपा कार्यकर्ते पेटून उठले भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले,संगमेश्वर येथे केंद्रीयमंत्री नारायण राणेंना सूडबुद्धीने अटक केल्यानंतर भाजपा कार्यकर्ते पेटून उठले. केवळ कार्यकर्तेच नव्हे तर जनताही पेटून उठली. जनता रात्री 1 वाजेपर्यंत राणेंच्या स्वागतासाठी थांबली होती. जिल्ह्यात मनाई आदेश जारी करून आणि भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दखल करून पोलीस प्रशासनाने राणेंचा दौरा प्रचंड यशस्वी करण्यात हातभारच लावला. यामुळे जनताही आता जागृत झाली असून राज्य सरकारच्या सूडाच्या राजकारणाविरोधात आता जनताच पेटून उठल्याचे सिंधुदुर्गात दिसून आल्याचे राजन तेली म्हणाले. आताच्या शिवसैनिकांची कीव येते आताच्या शिवसैनिकांची कीव येते. त्यांची शिकवणी घ्यावी लागेल असा टोला शिवसैनिकाना लगावताना राजन तेली म्हणाले, आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत. आमच्या काळात आम्ही एखाद्या मंत्र्याची गाडी अडवायची म्हटले की अडवून दाखवायचोच. आताचे शिवसैनिक पोलिसांच्या गराड्यात केवळ घोषणा देतायत. एकही मायचा लाल आमदार अथवा पदाधिकारी पुढे आडवा आला नाही. केवळ वरच्या नेत्यांचा फोन आला की घोषणा देण्याचे नाटक केले. आम्ही जनआशीर्वाद यात्रा अडवणारच म्हणणारे कुठे लपून राहिले समजले नाही. अशी टीकाही तेली यांनी केली.आताची शिवसेना ही चिवसेना झाली असल्याचा टोला त्यांनी लागवला. केसरकरांनी संघर्षाची भाषा करू नये गेले तीन टर्म आमदार असलेल्या दीपक केसरकर हे आज पर्यंत कोणत्याही रोजगारावर बोलताना दिसले नाहीत. अनेक घोषणा केल्या मात्र केवळ जनतेला फसवण्याचे काम केलं आहे. कोरोनाच्या काळात मुंबईत लपून बसलेल्या केसरकरांनी संघर्षाची भाषा करू नये असा टोला राजन तेली यांनी लगावला. ते म्हणाले एकीकडे भाजप मध्ये येण्यासाठी केसरकरांनी चर्चा करायची. देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरून मनधरणी करायची आणि दुसरीकडे नारायण राणे यांच्यावर टीका करायची अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना आतापर्यंत दोन वेळा संधी मिळाली, मंत्री झाले तरी एकही रोजगार देणारा प्रकल्प त्यांना सुरू करता आला नाही.आता हजारो कोटींचा प्रकल्प आणणार म्हणतायत. देवेंद्र फडणवीसांचे पाय धरून भाजपात घेण्याची विनवणी करणारे दीपक केसरकर सिंधुदुर्गात भाजपाशी संघर्षाची भाषा करताहेत. कसला संघर्ष करणार ? एकदा जाहीर तरी करा असे खुले आव्हान राजन तेली यांनी आमदार केसरकर यांना दिले आहेत.

You cannot copy content of this page