क्रॉफर्ड मार्केटचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते लोकार्पण

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* वेंगुर्ला नगरपरिषदेने नुतनीकरण केलेल्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीचा लोकर्पण समारंभ केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते २९ ऑगस्ट रोजी रात्रौ उशिरा करण्यात आला. मार्केटच्या केलेल्या विकासकामाबद्दल नारायण राणे यांनी गौरवोद्गार काढत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्यासहीत सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, निलम राणे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक शितल आंगचेकर, कृपा गिरप, सुहास गवंडळकर, राजेश कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे यांच्यासह नगरपरिषदचे प्रशासकीय कर्मचारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page