गर्दीचे श्रेय कार्यकर्त्यांना

जन आशीर्वाद यात्रा:नगराध्यक्ष संजू परब

*⚡सावंतवाडी ता.३०-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सावंतवाडीतील जंगी स्वागताचे सर्व श्रेय हे कार्यकर्त्यांचे आहे अशी भावना सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केली आहे. नारायण राणे यांचे सावंतवाडीत न भूतो न भविष्यती अशा पद्धतीत स्वागत झाले. रात्रीचे १२ वाजले असताना देखील हजारोंचा जनसमुदाय देखील राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होता. याचीच दखल नारायण राणे यांनी घेऊन दोडामार्ग येथील जाहीर सभेत त्यांचे कौतुक केले. याबद्दल नारायण राणे यांचे संजू परब यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page