कोलगाव येथे जनआशीर्वादयात्रेवेळी करण्यात आला सत्कार
*⚡सावंतवाडी ता.३०-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जनशीर्वाद यात्रे दरम्यान काल कोलगाव येथे श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने महिला शेतकरी भगिनींनी नऊवारी साडी नेसून औक्षण करत स्वागत केले. संघटनेचे ज्येष्ठ शेतकरी श्री.शांताराम सावंत आणि संघटनेचे अध्यक्ष श्री.मंगेश तळवणेकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शाल, श्रीफळ,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.”आपल्या जिल्ह्याचा एक सुपुत्र ‘शाखाप्रमुख पदापासून प्रवास सुरू करत केंद्रीय मंत्री झाला,याचा खूप आनंद आहे.श्री.नारायण राणेंच्या पाठीशी त्रैलोक्याचे दैवत श्री विठ्ठल रखुमाई चा आशीर्वाद नेहमीच राहील” असे गौरवोद्गार ज्येष्ठ शेतकरी श्री शांताराम सावंत यांनी काढले. यावेळी संघटनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा आरोस सहकारी सोसायटीचे संचालक श्री.लक्ष्मण देउलकर, लक्ष्मण गावकर,लाडू साईल,वासुदेव कळगुटकर,तुकाराम साईल,आपा नागवेकर,अर्जुन ठाकूर,शरद देसाई,आदी उपस्थित होते.
