देवगड-प्रतिनिधी नाडण वरची पुजारेवाडी येथील नितिन रामचंद्र घाडी (38) रा. नाडण याचा ओहोळाच्या पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. सदरची घटना हि रविवारी दुपारी 1.30 ते 4 वा. सुमारास घडली आहे. सदर घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा पर्यंत करण्याची प्रक्रिया चालू होती. नाडण पुजारेवाडी येथील नितिन घाडी हे दुपारी 11 वा. सुमारास आपल्या घरामधून बाजूलाच असलेल्या दुकानामध्ये गेले होते. त्या नंतर ते घराशेजारीच असलेल्या 100 मीटर ओहोळाच्या कटडयावरती उभे असतानाच ओहोळाच्या बंधा-यावरुन त्यांचा पाय घसरून पाण्यामध्ये तोल जावून पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदरची घटना रविवारी दुपारी 1.30 ते 4 वा. सुमारास घडली असून तेथील रामदास घाडी ओहोळावरती काहि कामा निमित्त सायं 4 वा. गेले असता त्यांच्या निदर्शनास सदरची घटना दिसून आल्याने त्यांनी तात्काळ तेथील पोलीस पाटील अजित महाडिक यांना सांगितले. यावरुन महाडिक यांनी घटनास्थळी जावून घटनेची पाहणी केली असता पुरुष जातीचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असल्याचे त्यांच्या निदर्शनास असल्यानंतर त्यांनी तात्काळ देवगड पोलीस स्टेशनला दुरध्वनी व्दारे संपर्क साधून सदर घटनेची माहिती देताना देवगड पोलीस तात्काळ नाडण वरची पुजारेवाडी येथे घटनास्थळी जावून तेथील पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने सदर घटनेची पाहणी केली असता तेथीलच नितिन रामचंद्र घाडी हि व्यक्ती असल्याचे ओळख पटली. शवविच्छेदन करण्यासाठी रविवारी सायंकाळी उशिरा देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये सदर मृतदेह आणला होता.नितिन घाडी यांच्या पश्चात त्यांना पत्नी,13 वर्षाचा मुलगा,10 वर्षाची मुलगी व आईवडिल असा त्यांचा परिवार आहे. घरातील एकुलता एक कमविता गेल्याने घाडी कुटुंबावरती मोठे संकटच आले असून संपुर्ण नाडण परिसरामध्ये सदर घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फोटो- नितिन घाडी यांचा ओहोळाच्या पाण्यामध्ये पडून झालेला मृत्यू
ओहोळात पडून युवकाचा मृत्यू
