काँग्रेसने आगामी सर्व निवडणुका स्व: बळावर लढवण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा; आवश्यक ते सहकार्य करू

आ. पटोले यांची ग्वाही; प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची माहिती

मालवण दि प्रतिनिधी आगामी काळात होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत आणि मालवण नगरपरिषद या दोन स्थानिक स्वराज्य संस्थाबरोबरच जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याही निवडणूका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडे केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा प्रदेश पातळीवर आवश्यक ती ताकद देऊन काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी सहकार्य करू अशी ग्वाही आम पटोले यांनी दिल्याची माहिती जिल्हा युवक राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकसभा व विधानसभा २०१९ निवडणुकीतील उमेदवार यांची बैठक मुंबईत टिळक भवन येथे घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष तथा कोकण समन्वयक माजी मंत्री नसीम खान, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री वसंत पुरके, पद्माकर वाळवी, माजी खासदार संजय निरुपम, व इतर ज्येष्ठ पदाधिकारी व लोकसभा विधानसभा उमेदवार उपस्थित होते. यावेळी प्रत्येक उमेदवाराला विचार व्यक्त करण्याची संधी देऊन त्या त्या भागातील सध्याची काँग्रेस पक्षाची ताकद, कार्यकर्त्यांच म्हणणं व भविष्यातील स्थानिक निवडणूका यावर चर्चा झाली. यावेळी अरविंद मोंडकर यांनी सिंधुदुर्गचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिलेल्या कुडाळ मधील जबाबदारी संदर्भात व विधानसभा उमेदवार या नात्यानं या मतदारसंघातील सध्याची स्थिती, आघाडी सरकार मधील सत्यता व पदाधिकारी कार्यकर्ते यांची येत्या निवडणूक मधील मानसिकता या सर्व बाबीवर चर्चा करण्यात आली दरम्यान लवकरच होणाऱ्या बँक निवडणूक मध्ये या मतदारसंघातील सध्याचे संचालक यांस योग्य सन्मान मिळत असल्यास त्या बाबतचा अहवाल जिल्हाध्यक्ष यांना देणार असून त्यावर जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील. दरम्यान निवडणूक हरलेल्या उमेदवारांना आघाडी सरकार असून देखील जिल्ह्यास्तरीय जिल्हानियोजन, शासकीय कमिटी मध्ये घेतले नसल्याचे अनेक उमेदवारांनी सांगितले. आपण जिल्हाध्यक्षांच्या पत्रा सोबत मला नाव सुचवा त्यानुसार त्या त्या जिल्ह्यातील संपर्क व आघाडी सरकार मधील पालकमंत्री यांच्याशी मी स्वतः समनव्यातुन ही पद देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी अरविंद मोंडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व माझ्या मतदारसंघातील रस्त्या च्या दुरुस्ती साठी माजी मुख्यमंत्री आताचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, जलक्रीडा व्यावसायिकांना मत्स्यव्यवसाय, बंदर मंत्री अस्लम शेख यांनी केलेलं सहकार्य व तौक्ते वादळ संदर्भात पहिल्यांदाच मिळालेल्या नुकसान भरपाई बद्दल पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सर्वां समक्ष आभार मानून अजूनही वाढीव निधी या वादळग्रस्तना मिळवून देण्यासाठी चर्चा केली. तसेच देवबाग व तळाशील मध्ये कायमस्वरूपी रिंगरोड सदृश्य बंधारा व्हावा या साठी आवश्यक कोट्यवधींच्या निधी देण्याबाबत पुढच्या कॅबिनेट मध्ये प्रस्ताव मांडू त्या साठी एक अहवाल बनवून तुम्ही पदाधिकारी मुंबईत या असे नाना पटोले यांनी सांगितले. तर देवबाग व तळाशील बंधारा पाहणीसाठी आपण येऊ, असे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले, त्यानुसार लवकरच पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत अशी माहिती अरविंद मोंडकर यांनी दिली.

You cannot copy content of this page