युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांना विश्वास
*⚡सावंतवाडी ता.२८-:* जन आशीर्वाद यात्रेमुळे सावंतवाडी तालुक्यात शिवसेनेला काडीमात्रही फरक पडणार नाही. त्यामुळे कितीही यात्रा काढल्या तरी यापुढील सावंतवाडी नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद शिवसेनेचीच सत्ता येणार अशी टीका युवासेना सावंतवाडी शहर अधिकारी विशाल सावंत यांनी केली आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले आहेत, जन आशीर्वाद यात्रेची पोस्टरबाजी करण्यापेक्षा कोरोना आजाराने ग्रासलेल्या ना मदत केली असती तर नक्कीच जन आशीर्वाद मिळाले असते तर नक्कीच आशीर्वाद मिळाले असते. अशी खोचक टीका विशाल सावंत यांनी केली आहे. प्रशासनाने लावलेल्या जमावबंदी चे उल्लघन करणारे जबाबदार व्यक्ती लोकांचे भले तरी काय करणार असा प्रश्न देखील त्यानी उपस्थित केला आहे. तसेच त्यानी यात्रेत जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही चुकीचे एकायला मिळाले तर शिवसैनिक गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सावंत यांनी दिला आहे
