*⚡कणकवली ता.२८-:* केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायणराव राणेंचे नांदगाव येथे दुपारी १२ वा . जन आर्शिवाद यात्रेचे आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशा पथक व नारायण राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणा करण्यात येवून जंगी स्वागत करण्यात आले .त्यांचे आजोळ असलेल्या नांदगाव येथे ही जंगी स्वागत करण्यासाठी नांदगाव तिठा येथे असंख्य कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते कासार्डे विभागाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. नांदगाव येथील आजोळ असलेल्या पाटील परीवाराच्या वतीने माजी सरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले तसेच नांदगाव भाजपा विभाग , नांदगाव विभाग सरपंच, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, मुस्लिम समाज,बचत गट महीला आदी विविध संघटना यांनी नारायण राणे यांचे भव्य स्वागत केले आहे. केंद्रीय सुष्म व लघु आणि मध्यमउद्योग मंत्री नामदार नारायणराव राणे यांनी नांदगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत केले नंतर जनतेला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कोकणातील जनतेला अभिमान वाटणारी घटना मोदी साहेब यांच्या मुळे घडली असून मी त्यांचा ऋणी असल्याचे सांगून सुष्म व लघु उद्योग मार्फत ३५ टक्के सबसिडी वर खुप व्यवसाय असून याचा आपण जरुर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे . समवेत या जनआशीर्वाद यात्रेत भाजप नेते आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड ,माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे,यात्रा प्रमुख प्रमोद जठार, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत, गोट्या सावंत, जयदेव कदम ,उपसभापती प्रकाश पारकर,तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके ,शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये , माजी सरपंच संजय पाटील, कमलेश पाटील,आदी कासार्डे जिल्हा परिषदेच्या मतदार संघातील सरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नांदगाव पंचायत समिती सदस्या सौ। हर्षदा वाळके यांनी मानले.
नांदगावात आजोळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे जंगी स्वागत
