*⚡मालवण ता.२८-:* नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित सौ. विंदा रामकृष्ण जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा यंदा प्रथमच ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. गेली दिड ते दोन वर्ष सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर इयत्ता ५ वी ते ७ वी या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक- यशश्री गुरूनाथ ताम्हणकर, द्वितीय- सर्वेश मनोहर करंगुटकर, तृतीय- भावेश ललितकुमार वराडकर, उत्तेजनार्थ प्रथम- कशिश निलेश लुडबे आणि उत्तेजनार्थ द्वितीय- वेदांत श्रीकांत वायंगणकर यांनी पटकावले तसेच जिल्हास्तरावर इयत्ता ८ वी ते १० वी या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक- सम्राट बाबूराव राजे, द्वितीय- मंथन दत्ताराम करलकर, तृतीय- दिप किशोर कांबळी, उत्तेजनार्थ प्रथम- ईशा जयराम सावंत आणि उत्तेजनार्थ द्वितीय- कृती राजेशभाई गोसावी यांनी पटकावला. दोन्ही गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रके ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात आली. या स्पर्धेचे परिक्षण शिवराज सावंत व श्रीमती ऋतुजा केळकर यांनी केले. स्पर्धा आयोजनासाठी सौ. श्रेया चव्हाण, यशश्री मालंडकर, रमाकांत जाधव यांनी परिश्रम घेतले. सर्व यशस्वी स्पर्धकांचे उदयराव मोरे, नागेश कदम, संजय शिंदे यांनी अभिनंदन केले.
ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
