संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जनआशीर्वाद यात्रेत ना.नारायण राणे यांच्याशी संवाद साधतात तेव्हा…

*⚡कणकवली ता.२८-:* जन आशीर्वाद यात्रेचा स्वागताचा सोहळा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एक फोन आला. व राणेंनी सर्व कार्यकर्त्यांना घोषणाबाजी देत असताना शांत करत कार्यकर्त्यांसमोर त्या फोनवर चर्चा केली. राणेंना आलेला तो फोन कुणाचा? याबाबत माहिती घेतली असता “तो” फोन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा असल्याची माहिती दिली. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नारायण राणे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी राणे यांनी माझी प्रकृती ठणठणीत आहे. विरोधकांनी माझी तब्येत बिघडल्याची हवा केली होती. मी हॉस्पिटललाही गेलो नव्हतो.असे सांगितले. दिल्लीवरून जनआशीर्वाद यात्रेची दखल घेतली गेली याचेच आम्हाला समाधान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेली नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कणकवलीहून ही यात्रा देवगडच्या दिशेने जात असताना कणकवली – जानवली येथे भाजपा कार्यकर्त्यांनी राणे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या वाटचालीची ही माहिती श्री राणे यांच्याकडून घेतली असता,आमच्याकडे जन आशीर्वाद यात्रा जोरदार सुरू आहे. मी आता यात्रेतच आहे असे सांगत राणे हे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करत असताना या दोघांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान विनोदांवर श्री .राणे खळखळून हसले. या वेळी राणे यांच्या बाजूला राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते. थेट दिल्लीहून कार्यकर्त्यांसमोर राणेंना फोन आला त्यामुळे साहेब कोणाशी बोलले? अशी एकच कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

You cannot copy content of this page