Headlines

31ऑगस्टपूर्वी खड्डे न भरले गेल्यास मनसे भिकमांगो आंदोलन करून निधी देणार

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला इशारा

*⚡कणकवली ता.२८-:* जिह्यातील रस्त्यांवरील खड्डे हा ज्वलंत प्रश्न असुन संबंधित सार्वजनिक बांधकाम, जिल्हापरिषद बांधकाम या यंत्रणे कडून प्रत्येकवेळी मोठ्याप्रमाणात पाऊस लागल्याने खड्डे पडले असं रोजचं उत्तर सर्वश्रुत आहे.रस्त्यांवरील खड्डे बुजाविण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे.या निवेदनात 31 ऑगस्ट 21 पूर्वी खड्डे बूजविण्याची डेडलाईन देखील दिली आहे. जर या डेडलाईन पूर्वी खड्डे न भरले गेल्यास जिल्ह्यातील मनसेचा प्रत्येक तालुकाध्यक्ष हा तालुक्यात “भिकमांगो’ आंदोलन करून जनतेकडून दिली जाणारी भीक त्यातून जमा होणारी रक्कम संबंधित यंत्रणेला देईल.आणि संबधीत यंत्रणेचा निषेध करेल असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे कोकणात गणेश चतूर्थी मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरी केली जाते. त्यानिमित्ताने परगावी असणारे चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी येतात.सोबत स्थानिक जनता या साऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हायला हवा.बाप्पाच्या मुर्त्या ने – आण करताना रस्त्यांवरील खड्डे त्रासदायक ठरतात.खड्यामुळे होणारे अपघात, वाहतूकीला होणारा त्रास.हे सारं थांबायला हवे. मात्र ठेकेदाराने केलेले काम योग्य पद्धतीने केलेले आहे की नाही..? लागणारी सामुग्री पुरेशी वापरलेलेली आहे की नाही….?हे या यंत्रणेच्या गावी कधीच नसते .यात भर म्हणजे सत्ताधारी व स्थानिक आमदार,खासदार यांच्या खड्डे बुजविण्याच्या लाखो, कोटीच्या दिल्या जाणाऱ्या भुलथापा हवेतच विरतात.खड्डे मात्र दिवसांगाणिक वाढतच असतात. खड्यामुळे होणारे अपघात, वाहतूकीला होणारा त्रास.हे सारे थांबायला हवे.यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्यातील तालुका अध्यक्षांनी 31 ऑगस्ट 21 पूर्वी खड्डे बूजविण्याची डेडलाईन देखील दिली आहे. जर या डेडलाईन पूर्वी खड्डे न भरले गेल्यास जिल्ह्यातील मनसेचा प्रत्येक तालुकाध्यक्ष हा तालुक्यात “भिकमांगो’ आंदोलन करून जनतेकडून दिली जाणारी भीक त्यातून जमा होणारी रक्कम संबंधित यंत्रणेला देण्यात येईल. असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page