*⚡कणकवली ता.२४-:* केंद्रीय उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांना झालेली अटक ही दुर्दैवी असून जोपर्यंत ना.नारायण राणे यांना सोडत नाही तोपर्यंत कणकवली पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला असून कणकवली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कणकवली पोलीस ठाण्यासमोर यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो.. अशा पद्धतीच्या घोषणा देत कणकवली पोलिस स्थानक दणाणून सोडले आहे .यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत ,राजश्री धुमाळे, पंचायत समिती सदस्य भाग्यलक्ष्मी साटम, अण्णा कोदे, शिशिर परुळेकर, ठाकूर, मेघा गांगण, महेश सावंत व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
कणकवली भाजपाचे पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलन
