शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?’

रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यानंतर आज रत्नागिरी पोलिसांकडून राणेंना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना महाड पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यात आलंय. दरम्यान, राणेंच्या अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलाय. यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केलं आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी पकडलं दाखवा, असं आव्हानच रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवं होतं. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, अशा शब्दात रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

You cannot copy content of this page