नड्डांचा ठाकरे सरकारला इशारा
*⚡नवी दिल्ली दि.२४-:* नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेवरून भाजपने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. दुसरीकडे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्र सरकारच्या कारवाईवरून गंभीर इशारा दिला आहे. नारायण राणेंना अटक करून राज्यघटनेची मूल्ये पायदळी चिरडण्यात आली आहेत. अशा कारवाईने आम्ही घाबरनार नाही आणि दबणार नाही, असं जे. पी. नड्डा म्हणाले. दरम्यान, शिवसेना कार्यकर्त्यांनी दिल्लीत राणेंच्या निवासस्थानासमोरील त्यांचे पोस्टर्स फाडले आहेत. महाराष्ट्र सरकारने लोकशाही पायदळी तुडवली आहे. अशा कारवाईला आम्ही घाबरत नाही आणि दबणार नाही. जनआशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या पाठिंब्यांमुळे शिवसेना आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्वस्थ झाले आहे. आम्ही लोकशाही मार्गाने लढत राहू. आणि जन आशीर्वाद यात्रा यापुढेही सुरू राहील, असं जे. पी. नड्डा यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
