३१ ऑगस्ट पर्यंत खड्डे न भरल्यास भीक मांगो आंदोलन करणार;मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांचा इशारा
देवगड कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण असून या कालावधीत तालुक्यातील सर्व सा. बा. उपविभाग देवगड यांच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी झुडपे व फांद्या तोडून संभाव्य अपघात नुकसान टाळण्याकरता विशेष मोहीम राबविण्यात यावी लाखो रुपयांचा निधी आल्याची वलग्ना केली जाते हा निधी कुठे गेला? अशी विचारणा मनसे देवगड तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी यांना करून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत स्त्यांमधील खड्डे व वाढलेली झाडी झुडपे तोडण्यात न आल्यास मनसेतर्फे भीक मागो आंदोलन करण्यात येऊन जमा झालेली रक्कम ३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड कार्यालयाकडे शासनाकडे देण्यासाठी सुपूर्द केला जाईल .असा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी सा. बा. उपविभाग देवगड यांच्याकडे यांच्याकडे दिला आहे. तसेच देवगड-निपाणी महामार्गातील गेल्या दीड वर्षातील काम सुरु असून त्यामधील काही काम निकृष्ट दर्जाचे व अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून सदर काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे. कोकणातील गणेशोत्सव प्रमुख्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यावी मुंबईकर चाकरमानी आपली खाजगी वाहने, त्याचप्रमाणे खाजगी बसेस,एसटी द्वारे गावागावातून येत असतात त्यामुळे रस्त्यांमधील खड्डे तात्काळ बुजवण्यात न आल्यास मोठे अपघात तसेच वाहतुकीची कोंडी होऊ शकते. वाढलेल्या झाडी झुडपांमुळे मुळे वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो तसेच रस्त्यांमधील खडे अपघाताला कारणीभूत होऊ शकतात.त्यामुळे हे सर्व रस्ते दगड मातीने न भरता पावसाळी डांबराने बुजविण्यात यावे व वाहतूक सुरक्षित करण्याकरता विशेष प्रयत्न करण्यात यावे. अशी मागणी मनसेच्या वतीने या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री उपाध्यक्ष महेश नलावडे, राजा मोंडकर, शहराध्यक्ष सचिन राणे उपस्थित होते.
