कलमठ कलमठ सरपंच निवडीनंतर शिवसैनिकांनी केला जल्लोष
*⚡कणकवली ता. २४-:* कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून धनश्री मेस्त्री या विजयी झाल्या आहेत. राणेंची जन आशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली आहे या यात्रे दरम्यान नारायण राणे हे मुख्यमंत्री व शिवसेनेच्या नेत्यांवर वादग्रस्त विधाने करत आहेत.राणेंचे हे वागणे जनतेला व त्यांच्याच ग्रा.प.सदस्यांना रुचले नसल्याने त्यांनी कलमठ सरपंच पदाच्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला मतदान करून सेनेच्या उमेदवाराला मतदान केले.त्यामुळे राणेंना ना जनतेचे ना त्यांच्या सदस्याचे आशीर्वाद नसून सेनेलाच त्यांचे आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया तालुका प्रमुख शैलेश भोगले यांनी दिली. कलमठ सरपंचपदी धनश्री मेस्त्री यांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड होताच शिवसेना महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव तसेच तालुका प्रमुख शैलेश भोगले,जी.प.सदस्या स्वरूपा विखाळे,राजू राठोड यांनी नवनिर्वाचित सरपंच धनश्री मेस्त्री यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर, सचिन सावंत,उपसरपंच वैदेही गुडेकर,सदस्य बाळू मेस्त्री, स्नेहल मठकर,भास्कर राणे,प.स.सदस्य मंगेश सावंत,संदेश पटेल,अँड हर्षद गावडे,रामू विखाळे,विलास गुडेकर,निसार शेख,सदस्य अनंत कदम,गोट्या कळसुलकर,शरद वायगणकर,संजना कोलते,भालचंद्र दळवी,किरण हुन्नरे,अमोल कोरगावकर,रिमेश चव्हाण,आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. तद्नंतर कणकवली पटवर्धन चौकात फटाके फोडत हा विजय उत्सव साजरा करत घोषणाबाजी करण्यात आली.
