पोलिसांचे पथक रवाना
*⚡मुंबई दि.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले आहे. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिस आयुक्तांनी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त संजय बरकुंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत. त्यानुसार सायबर पोलिसांचे पथक चिपळूणकडे रवाना झाले असून, यामुळे राजकीय आखाडा गरम होण्यास सुरुवात झाली आहे.
