पाडलोसमध्ये लसीकरणाचा टक्का वाढला

*⚡बांदा दि२४-:* संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वतःसह गावाचे संरक्षण करण्यासाठी पाडलोसमध्ये नुकत्याच झालेल्या कोवीशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या माध्यमातून मिळालेल्या डोसमुळे पाडलोस गावातील लसीकरणाचा टक्का वाढत असून नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतमध्ये झालेल्या लसीकरणावेळी पोलिस पाटील रश्मी माधव, आरोग्यसेविका एस.रंगसूर, समुदाय आरोग्य अधिकारी टी.आर.माजगावकर, आशासेविका कविता आंबेकर, अंगणवाडी सेविका अश्विनी साळगावकर, शुभांगी नाईक, गौरी शेटकर, युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक, मंदार आंबेकर व ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कोव्हेक्सीनवेळी ग्रामस्थांना लस मिळाली नव्हती परंतु नुकत्याच झालेल्या कोवीशिल्डचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घेतला. हळुहळु लसीकरणाचा टक्का वाढत असल्याने प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page