न. प. निवडणूक तोंडावर आल्याने सर्वांचे लक्ष सावंतवाडीतील स्वागतावर
*⚡सावंतवाडी ता.२३-:* केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा जन आशीर्वाद यात्रेस २६ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय त्या त्या तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे केंद्रबिंदू असलेल्या सावंतवाडी शहरात सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब त्यांचे कोणत्या प्रकारे स्वागत करतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. सावंतवाडी शहर नेहमीच राजकीय तसेच इतर उलाढालींबाबत चर्चेत राहिले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक संजू परब यांनी आपल्या नेतृत्वाखाली निवडून आणल्या होत्या. तसेच मागील नगरपालिका निवडणुकीत संजू परब मोठ्या मताधिक्याने निवडून येत नगराध्यक्ष पदाचे मानकरी ठरले होते. यावेळी नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा त्यांना नक्कीच फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संजू परब कोणत्या प्रकारे राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत करणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. नगराध्यक्ष पोटनिवडणूकी दरम्यान आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी करांना शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच कंटेनर थेटर उभारण्याची ग्वाही दिली होती. मात्र कोरोनाचे संकट देशावर आल्याने ते काहीसे होऊ शकले नाही. मात्र सावंतवाडीकर अद्याप देखील त्या प्रतीक्षेत आहेत. आगामी होणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या राणेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.
