मुलांमध्ये पाठांतराची आवड निर्माण व्हावी या हेतूने संस्कृत दिनाचे औचित्य साधून आयोजन
*⚡सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडी संचलित प्राथमिक शाळा कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्यावतीने संस्कृत दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाची तसेच पाठांतराची आवड निर्माण व्हावी या हेतूने गणपती स्तोत्र, शुभंकरोती, रामरक्षा, अथर्वशीर्ष, भगवदगीता यांचे श्लोक पाठांतर व्हिडिओ स्वरूपात स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये *गट क्रमांक एक (पहिली ते चौथी)- प्रथम .कु. चार्वी अनिल ठाकूर, द्वितीय .कु. गार्गी रमेश परब, तृतीय- कु. तनिष्क प्रवीण सानप गट क्रमांक दोन (पाचवी ते सातवी)- प्रथम .कु. नितेश नारायण सावंत, द्वितीय-कु. गायत्री राजेश परब-तृतीय कु.आर्या महेश सरमळकर, गट क्रमांक तीन (आठवी ते दहावी)-प्रथम-स्वरा प्रसाद डेगवेकर आणि कु. पूर्वा विश्राम मळीक, द्वितीय-कु.ऋग्वेद चंद्रशेखर देऊसकर, तृतीय कु.ईशान प्रवीण सानप यांनी यश मिळविले. या स्पर्धेसाठी संस्था सदस्या श्रीमती श्रद्धा नाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच संस्कृत विषयाच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती. जी. एस.सावंत तसेच श्रीमती. एम. एम. कदम यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एन. पी. मानकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत, संस्था सचिव डॉक्टर श्री.प्रसाद नार्वेकर, संस्था अध्यक्ष श्री. शैलेश पई, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. दत्तप्रसाद गोठोसकर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.
