खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार

सरपंच सेवा संघटक प्रविण गवस यांचा सार्वजनिक बांधकाम विभागास इशारा

*⚡दोडामार्ग ता.२१सुमित दळवी-:* दोडामार्ग ते भेडशी-तिलारी रस्त्यावर प्रवास म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे.संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.वाहनधारक अशाच अवस्थेत जीव धोक्यात घालून वाहने चालवत आहेत. यापूर्वी कित्येकदा अशा खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत. काहीजणांना आपला जीव गमवावा लागला. अशा घटना घडल्या असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही हे दुर्दैव आहेच. गणेश चतुर्थी पूर्वी हे खड्डे बुजविणे गरजेचे असताना याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष करताना दिसत आहे.गणेशोत्सव जवळ येऊन पोहोचला आहे. या मार्गावरून वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे कोणताही अपघात होण्यापूर्वी हे खड्डे तात्काळ बुजविण्याच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा याच मार्गावर रास्तारोको आंदोलन केले जाईल असा इशारा सरपंच सेवा संघटक प्रवीण गवस यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page