सामाजिक कार्यकर्ते विलास सावळ यांची मागणी
*⚡दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील कुंबल तळकट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नेटवर्क चा खेळखंडोबा सुरू आहे.परिसरात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड टॉवरवरून नेटवर्क सुविधा मिळत नसल्याने तेथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, कोरोना महामारीमुळे शाळा बंद, त्यातच ऑनलाईन शिक्षण चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांना नेटवर्क शोधत बसावं लागत आहे,विद्यार्थी,धान्य वितरक,त्याचबरोबर इतर काम करणाऱ्यांनाही त्याचा नाहक त्रास होत आहे,त्यामुळे नेटवर्क सुविधा येत्या आठ दिवसांत सुरळीत करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास सावळ यांनी केली आहे.
