एन.एम.एम.एस. परीक्षेत रामगड हायस्कूलचे यश

*⚡मालवण ता.२०-:* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत प्रगत विद्यामंदिर, रामगड या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत मिहीर मिलिंद गावकर, दीक्षा अनंत सावंत, दीक्षा विवेक मालंडकर, सानिका चंद्रकांत चोरगे, सायली संदीप मुणगेकर हे पाच विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते व सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला. सदर परीक्षेत मिहीर मिलिंद गावकर हा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक आला असून या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्याना प्रशालेचे शिक्षक एस.एच. कांबळे, डी.डी. सावंत, एम.पी. पवार, सौ. डी.डी. सांबरे, या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गुणवत्ता यादीत येणाऱ्यांचे विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. वा.स. प्रभुदेसाई, उपाध्यक्ष श्री. सु.श. तळवडेकर, सचिव श्री.वि.म. भटकर, खजिनदार श्री. सदानंद वाघ, सर्व संस्था संचालक श्री. अभय प्रभुदेसाई, श्री. विजय कुवळेकर, श्री. सुभाष धुरी, श्री.ज्ञानदेव जाधव, श्री. रामचंद्र घाडीगांवकर, श्री. नरेंद्र हाटले, श्री. नरहरी परुळेकर, श्री. रामचंद्र कामतेकर, श्री. तातोबा घाडीगांवकर, श्री. घनश्याम चव्हाण, श्री. मोहन घाडीगांवकर, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अ.म. वळंजू, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी सर्वानी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page