विद्यार्थी आत्मविश्वास गमावायच्या अगोदर शाळा लवकर सुरु करा

*⚡मालवण ता.२०-:* मुलांना परीक्षांमधुन मिळालेल्या गुणांचा आणि प्रवेश प्रक्रीयेचा ताळेबंद जुळत नसल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत असल्याने सद्यस्थितीत शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात अन्यथा विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम व्हायला सुरवात होईल, अशी भिती नॅशनल ॳॅण्टी करप्शन ॳॅण्ड ॳॅण्टी ॳॅट्राॅसिटी टायगर फोर्स सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. गेली दीड वर्ष शाळा बंद स्थितीत आहेत. या दीड वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान पुढील दशक भर चिंतेच वातावरण असेल. दहावी, बारावी परीक्षांमध्ये नव्वद टक्के गुण मिळवुनही चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही ही भावना विद्यार्थ्यांना नैराश्या कडे नेणारी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ॴॅनलाईन शिक्षणामध्ये न मिळणारी रेंज हा मोठा अडसर असुन तो दुर करण्यापेक्षा शाळाच सुरु करा अशी भावना पालक व विद्यार्थी यांची झालेली दिसून येते. सेतु अभ्यासक्रम, चाचणी परीक्षा यांच्या बाबतीत मोबाईल रेंजचा अडसर असल्याने शिक्षकांना वाडीवस्तीवर मुलांना प्रश्नपत्रिका पोहचवणे , उत्तरपत्रिका गोळा करणे यासाठी फीरावे लागत आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापराने होत असलेले डोळ्यांचे आजार ही एक गंभीर समस्या आहे. शिक्षकांना कोविड ड्युटी साठी वापरुन ,शिक्षण व कोविड ड्युटी यामध्ये होणारी शिक्षकांची ससेहोलपट थांबवावी, शाळा सुरु करत शिक्षकांना शिक्षण प्रवाहात आणुन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, शाळेची घंटा लवकरात लवकर वाजवुन शासनाने विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणावा अशी मागणी टायगर फोर्स च्यावतीने करण्यात येत आहे, असेही अजय शिंदे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page