नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गतर्फे व्यसनमुक्तीचे बंधन व्यसनांपासून रक्षण कार्यक्रम

*⚡कणकवली ता.२०-:* रक्षाबंधनच्या निमित्ताने नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला वर्गाच्यावतीने व्यसनमुक्तीचे बंधन व्यसनांपासून रक्षण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांच्यासह सुगंधा कारेकर,गीतांजली तावडे,सुवेदिता घाडीगांवकर, सायली दळवी,सृष्टी घाडीगांवकर ,मनवा तावडे, ध्रुव तावडे आदी उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील महिलांचे व्यसनांमुळे होणाऱ्या दुष्परिणाम पासून रक्षण करावे , आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्यसनमुक्तीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती करावी, निदान देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी आपल्या सर्व भगिनींची व्यसनामुळे होणाऱ्या त्रासांपासून सुटका करण्यासाठी तसेच बालके आणि युवा पिढी व्यसनमुक्त राहण्यासाठी आपला महाराष्ट्र व्यसनमुक्ती च्या दिशेने वाटचाल करावी असे वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन आपण सामाजिक न्याय मंत्री म्हणून आम्हाला रक्षाबंधनच्या निमित्ताने द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page