रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानतर्फे उद्या रक्तदान शिबीर

*⚡कणकवली ता.२०-:* कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार २१ ऑगस्ट रोजी वृंदावन हॉल, कणकवली येथे सकाळी ९.०० ते १ वा. या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.तरी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन अमेय मडव मित्रपरिवार यांनी केले आहे. गेली ६-७ वर्षे रक्तदान क्षेत्रात काम करत असताना रक्ताची गरज ओळखून हे रक्तदान शिबिर आयोजित करीत असल्याचे रक्तमित्र अमेय मडव यांनी सांगितले.ज्यांची पहिली किंवा दुसरी कोव्हीड प्रतिबंधात्मक लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत ते सुद्धा रक्तदान करू शकतात. त्यामुळे शासनाच्या कोव्हिडं प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. इच्छुक रक्तदात्यांनी खालील नंबरवर संपर्क साधावा.संपर्क: अमेय मडव: 9619326057, अभिषेक नाडकर्णी 9404936068, परेश आचरेकर 9420155951, तुषार पावसकर 9405256425, योगेश जाधव 8793309966, सर्वेश राणे 7769930458 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page