इंटरनेट अभावी शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम…
*⚡सावंतवाडी ता.२०-:* सोनुर्ली गावात असलेल्या बीएसएनएल टॉवरच्या नेटवर्कमध्ये वारवार बिघाड होत असल्याने गावात मोठी समस्या निर्माण झाली आहे, इंटरनेटही सेवाही सुरळीत नसल्याने ऑनलाईन अभ्यासात व्यत्यय येत असल्याने ग्रामस्थातुन नाराजी व्यक्त होत आहे, संबधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष वेधावा अशी मागणी ग्रामस्थांनी होत आहे. सोनुर्ली गावामध्ये बीएसएनएलची सेवा दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली आहे मात्र सदरच्या सभेमध्ये वारंवार खंड पडत असल्याने या ठिकाणी बीएसएनएल धारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे सद्यस्थितीत कोरोनामुळे शालेय अभ्यासक्रम ऑनलाइन सुरू आहे त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते, मात्र असे असतानाही याठिकाणी असलेल्या टॉवरमध्ये बिघाड होत असल्याने इंटरनेट सेवेतही खंड पडत आहे हे परिणामी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने त्याकडे लक्ष वेधून असलेला बिघाड तात्काळ दूर करावा अशी मागणी होत आहे.
