आजगांव येथे पार पडला गुरुवंदना कार्यक्रम

श्री राधाकृष्ण संगीत साधना विद्यालयाचा उपक्रम

*⚡सावंतवाडी ता.२०-:* संगीत विशारद विणा दळवी संचलित श्री. राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग या विद्यालयाच्या सावंतवाडी, तळवडा, माणगाव व आजगाव शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून गुरू पौर्णिमे निमित्त गुरुवंदना संगीत सोहळा कार्यक्रम आजगाव येथील श्री. देव वेतोबा मंदिर सभागृहात गुरुवार पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गायक संगीत विशारद सुनील पाडगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, मळेवाड सरपंच हेमंत मराठे, आजगाव सरपंच सुप्रिया मेस्त्री, सावंतवाडी माजी नगरसेवक देवेंद्र टेमकर, नाट्य दिग्दर्शक भाऊ साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page