कासार्डे -आनंदनगर येथे इसमावर केला गुन्हा दाखल
*⚡कणकवली ता.१२-:* रस्त्यावरील दुचाकी बाजूला घ्यायला सांगितल्याच्या रागातून एका व्यक्तीने ट्रक चालकाला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना कासार्डे-आनंदनगर येथे घडली आहे. तसेच ट्रकच्या केबीनची काच फोडून १८,७०० रुपयेही लंपास करण्यात आले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रक चालकाच्या तक्रारीवरून एकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
