नागरिकांत खळबळ:पोलिसांत घेतली धाव
*⚡सावंतवाडी ता.१२-:* शहरातील बाजारपेठेत महाड येथील एका इसमाने आपल्या पिशवीतील केशकर्तनालयातील धारदार हत्यार दाखवली. यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते, त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल होत. त्या इसमाला ताब्यात घेतले. ती व्यक्ती वेडसर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर त्याला चौकशी करून मूळ गावी रेल्वेतून पाठवून देण्यात येणार असल्याचे सावंतवाडी पोलिसांनी सांगितले
