गितेश गावडेच्या कुटूंबाला मदत उपलब्ध करून द्यावी

बांदा सरपंच अक्रम खान यांनी आम. नितेश राणे यांची भेट घेत केली मागणी

*⚡बांदा दि.१२-:* गाळेल येथे डोंगराची माती पडून दुर्दैवी अंत झालेल्या वेंगुर्ले येथील गितेश गावडे या युवकाच्या कुटूंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली आहे. आम.नितेश राणे यांची कणकवली येथे बांदा सरपंच अक्रम खान यानी भेट घेतली. यावेळी चर्चा करताना गितेश गावडे या युवकाच्या कुटूंबाला मदतीची गरज असून गितेशच्या अकाली निधनाने कुटूंबाचा आधार गेला असल्याचे त्यांनी सांगितले व मदतीची मागणी केली.यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page